वार्षिक उपक्रम
-
सामाजिक उपक्रम
समाजहिताला प्राधान्य देत श्री साई मित्र मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबविते. रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे आयोजन केले जाते. समाजात एकोपा, सेवाभाव आणि जनजागृती निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे.
-
शैक्षणिक उपक्रम
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जातात. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शालेय साहित्य वाटप व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम राबविले जातात.
-
सांस्कृतिक उपक्रम
भारतीय संस्कृती आणि परंपरांचा वारसा जपण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. भजन,नृत्य,संगीत आणि कला स्पर्धांमधून कलागुणांना वाव दिला जातो. गणेशोत्सवाच्या काळात भक्ती आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवता येतो.
-
क्रीडा उपक्रम
युवकांमध्ये क्रीडाभावना वाढविण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि इतर खेळांद्वारे खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते. युवा पिढीला सकारात्मक दिशा देणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
तुमच्या सूचना आणि अभिप्राय
आमच्या सेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी, तुमच्या मौल्यवान सूचना आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, आम्हाला नक्की कळवा.














